'तांडव' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
   दिनांक :04-May-2019
संतोष चिमाजी जाधव यांनी दिग्दर्शन केलेल्या ‘तांडव’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. हा चित्रपट महिला सबलीकरण या विषयावर आधारित आहे. महिला सबलीकरणावर अनेक गोष्टी आपण केवळ बोलतो, परंतु त्यावर आधारीत एका आव्हानात्मक चित्रपटाची निर्मिती सुभाष काकडे यांनी केली आहे. चित्रपटाची मूळ संकल्पना रामेश्वर काकडे यांची आहे. 
 
त्याचबरोबर सिनेमा हे क्षेत्र प्रभावी माध्यम असून तांडव या सिनेमातून महिला सबलीकरणाचा हेतू साध्य करण्याचा प्रयत्न कौतुकास्पद असाच आहे. या सिनेमामध्ये नील राजूरीकरने सुद्धा अफ़लातून भूमिका साकारली आहे. तर सयाजी शिंदे यांनी विरोधकाची भूमिका चोख बजावली आहे. चित्रपटामध्ये पूजाने लढाई कशी करायची, विरोधकांचा कसा पडदा फाश करायचा याचे उत्तम उदाहरण तिने दिले आहे. महिलांच्या सर्वच क्षेत्रातील उत्तुंग अशा कामगिरीबद्दल नेहमीच बोलले जाते, परंतु यावर आधारीत नायिकाप्रधान चित्रपट क्वचितच प्रेक्षकांच्या भेटीला येतात. तांडव हा सिनेमा महिलांना प्रेरणादायी ठरेल अशी आम्ही आशा बाळगतो.
 

 
 
अरूण नलावडे, पूजा रायबागी, नील राजूरीकर, आशिष वारंग, स्मिता डोंगरे, सुप्रिया गावकर आणि सयाजी शिंदे यांच्या तांडव या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका आहेत. तांडव या चित्रपटाची गोष्ट एका कर्तव्यनिष्ठ महिला पोलीस अधिकारीच्या आयुष्यावर बेतलेली आहे.