माधुरी झळकणार छोट्या पडद्यावर
   दिनांक :05-May-2019
आपल्या मोहक अदाकारीने सिनेरसिकांना घायाळ करणारी 'धकधक गर्ल', अभिनेत्री माधुरी दीक्षित आता छोट्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. 'डान्स दिवाने' या रियालिटी शोच्या दुसऱ्या भागात माधुरी कोरियॉग्राफर तुषार कालिया आणि दिग्दर्शक शशांक खेतान यांच्यासोबत परीक्षकाच्या भुमिकेतून पदार्पण करणार आहे. या रियालिटी शोच्या चित्रीकरणाच्या कामात माधुरी सध्या व्यस्त आहे.
  
 
या कार्यक्रमाचं चित्रीकरण मड आयलंडमधील ऐरंगल गावात शुक्रवारी सकाळी ११ वाजल्यापासून चालू झाले. रात्री उशीरापर्यंत हे चित्रीकरण चालू होतं. चित्रीकरणासाठी ऐरंगल गावाचा लुक एकदम बदलून टाकण्यात आल्याचं सूत्रांकडून समजतं.
या शोसाठी माधुरी दीक्षितने १९८१ मध्ये अमिताभ बच्चन यांच्या याराना चित्रपटातल्या 'सारा जमाना हसिनों का दिवाना' या गाण्यात काही बदल केले. 'सारा जमाना डान्स का दिवाना' या शब्दांसह हे गाणं चित्रित केलं गेलं. या गाण्यात माधुरी वेगवेगळ्या लुक्समध्ये दिसणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.