सलग १२६ तास नृत्य करून नेपाळी तरुणीचा विश्वविक्रम
   दिनांक :05-May-2019
काठमांडू, 
शेजारच्या नेपाळमधील एका तरुणीने जगाला आश्चर्याने बोटे तोंडात घालायची वेळ आणली आहे. या तरुणीने तब्बल १२६ तास न थकता न थांबता नृत्य करत विश्वविक्रम केला आहे. हा विक्रम करणारी ही जगातील पहिली तरुणी बनली आहे. याआधी हा विक्रम एका भारतीयाच्या नावावर होता. 
 
 
तसे नृत्य करणे हा शरीराला थकवणारा प्रकार आहे. फार तर तास-दीड तास नृत्य करणे शक्य आहे. मात्र, नेपाळच्या तरुणीने १२६ तास नृत्य केले आहे. वंदना नेपाल असे या तरुणीचे नाव असून, नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी शनिवारी वंदनाचा सत्कार केला. तिचे वय अवघे १८ वर्षे आहे.
 
या विक्रमाची नोंद गिनीज बुकने शुक्रवारी घेतली आहे, अशी माहिती वंदनाने दिली. ती नेपाळच्या धनकुटा जिल्ह्यातील रहिवासी आहे. तिने भारताच्या कलामंडलम्‌ हेमलता यांनी केलेला विक‘म मोडला आहे. हेमलता यांनी २०११ मध्ये १२३ तास आणि १५ मिनिटे सलग नृत्य करीत विश्वविक‘म केला होता.