तालिबानी हल्ल्यात ७ अफगाण पोलिस ठार
   दिनांक :05-May-2019
काबुल,
पश्चिमी बदगीस प्रांतामध्ये तालिबानने एका रात्रीत अनेक सुरक्षा तपासणी चौक्या उडविल्या. या स्फोटांमध्ये अफगाणिस्तान मधील ७ पोलिस कर्मचारी ठार झाली, अशी माहिती अफगाणिस्तानच्या एका अधिकार्‍याने दिली. 
 
 
कदीस जिल्ह्यामध्ये हल्ल्यादरम्यान तीन अन्य सुरक्षा कर्मचारी जखमी झाले. तालिबानने या हल्ल्यांबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली नाही, अशी माहिती प्रांतीय परिषदेचे सदस्य मोहम्मद नसीर यांनी दिली. अफगाण दलांसोबत समन्वय करून आघाडी केलेल्या सुरक्षा गटांनी शुक्रवारी रात्री दोन वेगवेगळे हवाई हल्ले केले. त्यामध्ये पूर्व कुनार प्रांतामध्ये इसिसचे किमान ४३ अतिरेकी मारले गेले, असे अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने शनिवारी सांगितले.
 
चापरा जिल्ह्यात हवाई हल्ला करून इसिसला लक्ष्य करण्यात आले. त्यात अनेक पाकिस्तानी आणि उझबेक नागरिक मारले गेले. तालिबान आणि इसिस या अतिरेकी संघटना पूर्व अफगाणिस्तानात, विशेषत: कुनार आणि शेजारील नानगरहार प्रांतात सकि‘य असून, हे प्रांत पाकिस्तानी सीमेजवळ आहेत.