आमिर खान आणि रिंकू राजगुरू
   दिनांक :05-May-2019
नुकतीच ‘कागर’ या चित्रपटातून सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू प्रेक्षकांच्या भेटीला आली. प्रेक्षकांची मने पहिल्याच चित्रपटातून रिंकूने िंजकली होती. तिला या चित्रपटातील भुमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कारसुद्धा मिळाला होता. बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने अशा या रिंकूला बहुमुल्य सल्ला दिला आहे. त्याचबरोबर तिच्या अभिनयाचे कौतुक देखील आमिरने केले आहे.
 
 
 
फेमसली फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत रिंकूनेे सांगितले की- माझ्याकडे आमिर खान यांच्याशी बोलताना शब्दच नव्हते. मी त्यांच्या प्रश्नांना काय उत्तरे देऊ हेच मला कळत नव्हते. पण िंहमत एकवटून मी त्यांच्याशी बोलले. माझ्या कामाचे त्यांनी कौतुक केले. तसेच त्यांनी माझ्याशी बोलताना मला एक खूप छान सल्ला दिला. ते म्हणाले- कितीही प्रसिद्धी मिळाली तरी त्याने भारावून जायचे नाही. एका छोट्याशा मी गावातून आले आहे. पण प्रेक्षकांनी मला डोक्यावर घेतले. पण यापुढे देखील मी खूप मेहनत घेतली पाहिजे. तसेच प्रामाणिकपणे आणि व्यावसायिक पद्धतीने वागले पाहिजे असेही त्यांनी मला सांगितले. आपल्यासाठी आमिरचा हा सल्ला लाखमोलाचा असल्याचे ती सांगते.