स्थितप्रज्ञ गोमती
   दिनांक :05-May-2019
तामिळनाडू राज्यातील तिरुचीराप्पाल्ली गावातील मुलगी- गोमती मरीमुथू. आपल्याला आयुष्यात काय करायचे आहे, याचा दृढनिश्चय करून आपली वाटचाल सुरू ठेवली. तिच्या या कष्टाचे फळ मिळाले. अलिकडेच दोहा, कतार येथे झालेल्या 23 व्या आशियाई अॅथ्लेटिक्स स्पर्धेत गोमतीने 800 मीटर शर्यतीत वैयक्तिक सर्वोत्तम वेळ नोंदवित भारताला प्रथमच सुवर्णपदक िंजकून दिले.
 
 
 
दुखापतीतून सावरल्यानंतर पुनरागमन करणार्‍या गोमतीने या स्पर्धेत 2 मिनिट 02.70 सेकंद अशी वैयक्तिक सर्वोत्तम वेळ नोंदवली आणि आपले पहिले आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक िंजकले. तिने यापूर्वी पतियाळा येथे फेडरेशन चषक स्पर्धेत नोंदविलेल्या 2.03.21 सेकंदा या सर्वोत्तम कामगिरीलाही मागे टाकले. मूळात गोमती शेतकरी कुटुंबातील. तिचे वडील मरीमुथू शेतकरी होते. त्यांनाही अॅथ्लेटिक्सची उत्तम जाण होती. त्यामुळे गोमतीला अॅथ्लेटिक्समध्ये रूची निर्माण झाली आणि तिने वयाच्या 20 व्या वर्षापासून व्यावसायिक दौड शर्यतीत भाग घेण्यास सुरुवात केली. वडील हेच तिचे पहिले गुरु.
  
2013 मध्ये पुणे येथे आयोजित आशियाई अॅथ्लेटिक्स स्पर्धेत ती सातवी आली होती. दोन वर्षांनंतर गोमतीने वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी करत चौथे स्थान मिळविले. गोमतीला आशियाई स्पर्धेत आपली सर्वोत्तम वेळ नोंदविण्यासाठी 6 वर्षे कष्ट करावे लागले. चीनच्या वुहान येथे आयोजित आशियाई स्पर्धेत तिने चक्क वैयक्तिक सर्वोत्तम वेळेसह सुवर्णपदक िंजकले.
पदकवितरण सोहळ्यात गोमतीच्या डोळ्यात दुःख तसेच आनंदाश्रू तरळू लागले. कारण त्या क्षणी तिला तिचे स्वर्गीय वडील व प्रशिक्षक गांधी यांची खूप आठवण आली. आज हयात असते तर त्यांना माझ्या कामगिरीचा अभिमान वाटला असता. तो पदकसोहळा तिच्या आयुष्यातील सर्वात मोठा दिवस होता.
 
कारण गत दहा वर्षांतील तिचा हा क्रीडा प्रवास अतिशय संघर्षमय राहिला. या क्रीडाप्रवासदरम्यान तिने दोन आधारस्तंभ गमावले. सप्टेंबर 2016 मध्ये गोमतीच्या वडिलांचा कॅन्सरने मृत्यू झाला व त्यानंतर काही महिन्यांनी तिचे प्रशिक्षक गांधी यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. या दुःखाच्या डोंगरात आणखी एक भर पडली. गोमतीच्या पायाचे सांधे जखमी झाले. आयुष्यात सारे काही संपले, अशा विचारात गोमती पडली मात्र तिला तिची मैत्रीण सृष्टी हिच्याकडून धीर मिळाला. कारण गोमतीममध्ये प्रतिभा आहे, याची जाणीव सृष्टीला झाली होती. सृष्टीनेच तिला तंदुरुस्त झाल्यानंतर पुन्हा मैदानावर येण्यास प्रोत्साहन दिले आणि गोमती पुन्हा मैदानावर आली. सृष्टीशिवाय तिला तिरुचीराप्पालीच्या होली क्रॉस महाविद्यालयाची उत्तम मदत मिळाली. गोमती तिथेच शिकली. आज गोमती बंगळुरू येथे आयकर विभागात सेवारत आहे. 52 वर्षीय आई रसथी शेतमजुरी करते. गोमती तीन भावंड असून एक भाऊ एम. सुब्रमणी व बहीण आहे.
 
आताचे प्रशिक्षक जसिंवदर िंसग भाटिया यांच्या मार्गदशनाखाली गोमतीने दोहा कतारमध्ये भारताला पहिले आशियाई सुवर्णपदक िंजकून दिले. शर्यतीच्या अंतिम टप्प्यासाठी ऊर्जा राखून ठेवण्याच्या तंत्रावर मी भर दिला. या व्यूहरचनेनुसार मी केवळ आठशे मीटरची शर्यतच िंजकली नाही, तर माझी सर्वोत्तम वैयक्तिक 2 मिनिट 02.70 सेकंदाची वेळ नोंदविली, असे गोमती म्हणाली. सुवर्णपदक िंजकल्यानंतर गोमतीचे अलापक्कम येथील वेलाम्मल विद्यालयात तिचेउत्स्फूर्तपणे स्वागत-सत्कार करण्यात आला. आता काही दिवस आईसोबत घालवेल व त्यानंतर कोलकाता येथे होणार्‍या आंतरराज्य अॅथ्लेटिक्स स्पर्धेची पूर्वतयारी करेल. गोमतीचे पुढील लक्ष्य याचवर्षी सप्टेंबर महिन्यात दोहा येथे होणारी जागतिक अथ्लेटिक्स स्पर्धा आणि 2020 टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा आहे.
मिलिंद महाजन
7276377318