IPL २०१९ : कोलकाता नाइट रायडर्सला बाद फेरी गाठण्याची संधी

    दिनांक :05-May-2019
कोलकाता नाइट रायडर्सची इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटची बाद फेरी गाठण्याची संधी कठीणअवस्थेत आहे. त्यामुळे रविवारी वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या मुंबई इंडियन्सविरुद्धच्या अखेरच्या साखळी सामन्यात मोठय़ा फरकाने विजय मिळवण्याचे आव्हान त्यांच्यापुढे असेल.
 
 
 
कोलकाताने किंग्ज ईलेव्हन पंजाबविरुद्धची लढत जिंकून आपल्या बाद फेरीच्या आशा अखेरच्या लढतीपर्यंत शाबूत ठेवल्या आहेत. सनरायजर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुला शनिवारी नमवल्यास कोलकाता निव्वळ धावगती उंचावून विजय मिळवावा लागणार आहे.
आंद्रे रसेलच्या चौफेर फटकेबाजीची प्रतिस्पर्धी गोलंदाजांनी धास्ती घेतली आहे. ख्रिस लिन आणि शुभमन गिल यांनाही आता सूर गवसला आहे. त्यामुळेच वानखेडेच्या फलंदाजीला अनुकूल खेळपट्टीवर बाद फेरी गाठण्यासाठी कर्णधार दिनेश कार्तिक आशावादी आहे. गिलने मुंबई आणि पंजाबविरुद्धच्या लागोपाठच्या सामन्यांत अर्धशतके झळकावली आहेत. परंतु गोलंदाजीत त्यांचे कच्चे दुवे समोर येतात. वेगवान गोलंदाज हॅरी गुर्नी, संदीप वॉरियर, सुनील नरिन आणि पीयूष चावला यांच्या मुंबई फलंदाजांना वेसण घालण्याचे आव्हान असेल. कोलकाताचा संघ अखेरच्या सामन्यात ‘चायनामन’ कुलदीप यादवला संधी देण्याची दाट शक्यता आहे.
संघ :
 
मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डी’कॉक (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, युवराज सिंग, किरॉन पोलार्ड, हार्दिक पंडय़ा, कृणाल पंडय़ा, मिचेल मॅक्क्लिनॅघन, मयांक मरकडे, राहुल चहर, जसप्रीत बुमरा, अनमोलप्रीत सिंग, सिद्धेश लाड, अनुकूल रॉय, एव्हिन लेविस, पंकज जैस्वाल, बेन कटिंग, इशान किशन (यष्टीरक्षक), आदित्य तरे, रसिक सलाम, बिरदर शरण, जयंत यादव, ब्युरान हेंड्रिक्स, लसिथ मलिंगा.
कोलकाता नाईट रायडर्स : दिनेश कार्तिक (कर्णधार व यष्टीरक्षक), रॉबिन उथप्पा, ख्रिस लिन, शुभमन गिल, आंद्रे रसेल, कार्लोस ब्रेथवेट, सुनील नरिन, पीयूष चावला, कुलदीप यादव, निखिल नाईक, जोए डेन्ली, श्रीकांत मुंढे, नितीश राणा, संदीप वॉरियर, प्रसिध कृष्णा, लॉकी फग्र्युसन, हॅरी गुर्नी, के. सी. करिअप्पा, यारा पृथ्वीराज, मॅट केली.
सामन्याची वेळ : रात्री ८ वा.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १