सान्या मल्होत्राची ऑस्करवारी
   दिनांक :05-May-2019
सान्या मल्होत्राने एकापाठोपाठ एक अशा अनेक चित्रपटांत दमदार भूमिका निभवली असून गतवर्षी ती ‘बधाई हो’मध्ये दिसली होती. या चित्रपटाने केवळ प्रेक्षकांचे मनोरंजनच केले नाही तर बॉक्सऑफिसवर कमाईचे अनेक विक्रमही रचले. यानंतर सान्याला अनेक मोठे प्रोजेक्ट मिळाले. नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत ‘फोटोग्राफ’ या सिनेमात ती झळकली. पाठोपाठ अनुराग बासूच्या ‘लाईफ इन अ मेट्रो’चा सीक्वलही तिच्या झोळीत पडला. आता सान्याच्या हाती असाच एक मोठा चित्रपट लागला आहे.
 

 
 
ऑस्कर विजेत्या निर्मात्या गुनीत मोंगा यांच्या पुढील सिनेमात सान्याची वर्णी लागली आहे. गुनीत मोंगा निर्मित ‘पीरियड एन्ड आॅफ सेंटेंस’ला बेस्ट डॉक्युमेंट्री शॉर्ट कॅटिगरी फिल्म श्रेणीत ऑस्कर पुरस्कारने सन्मानित करण्यात आले होते. याच ऑस्कर विजेत्या डॉक्युमेंट्रीच्या निर्मात्या इंडियन फिल्म प्रोड्यूसर गुनीत मोंगा लवकरच एक हिंदी चित्रपट बनवत आहेत. या चित्रपटासाठी सान्याचे नाव फायनल झाले आहे. खुद्द गुनीत मोंगा यांनी हा खुलासा केला. आम्ही एक हिंदी चित्रपट बनवत आहोत. यात सान्या मल्होत्रा लीड रोलमध्ये असेल. हा चित्रपट एका लहानशा शहरातील मुलीची कथा असेल, असे त्यांनी सांगितले.