ब्रम्हपुरी येथे अपघातात जखमी पोलीस कर्मचाऱ्यांचे प्राण वाचवणाऱ्या डांगे दाम्पत्याचा सत्कार
   दिनांक :05-May-2019
 
 
 
 
ब्रम्हपुरी :  ३० एप्रिलच्या रात्री  १२ वाजता गस्तीवर असलेल्या पोलिस विभागाच्या वाहनाला अपघात झाला होता. झालेल्या अपघातात जखमी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना ब्रम्हपुरी तालुका पत्रकार संघाचे सदस्य प्रशांत डांगे व त्यांच्या पत्नी प्रा. सरोज डांगे यांनी तात्काळ मदत कार्य करून कर्तव्यदक्ष नागरिकाची भूमिका पार पाडली. प्रत्येक नागरिकांनी अपघात ग्रस्तांना मदत करण्यास पुढे यावे हा संदेश सर्वत्र पोहचावा या करिता पत्रकार प्रशांत डांगे व प्रा. सरोज डांगे या दाम्पत्याचा ब्रम्हपुरी तालुका पत्रकार संघातर्फे महाराजा फुड प्लाझा आरमोरी रोड ब्रम्हपुरी, येथे आयोजित कार्यक्रमात उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत परदेशी यांचे हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. तसेच जांभूरखेडा येथे नक्षली हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना ब्रम्हपुरी तालुका पत्रकार संघातर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी ब्रम्हपुरी तालुका पत्रकार संघाचे सर्व पत्रकार बंधू उपस्थित होते.