IPL 2019; ऋषभ पंतने सेहवागला टाकले मागे

    दिनांक :05-May-2019
आयपीएलच्या बाराव्या हंगामात दिल्ली कॅपिटल्स संघाने बाद फेरीत आपले स्थान निश्चीत केले आहे. तब्बल ७ वर्षांनी स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश करणाऱ्या दिल्लीने यंदा आपल्या संघात महत्वाचे बदल केले होते. शनिवारी राजस्थानविरुद्ध आपल्या अखेरच्या सामन्यातही दिल्लीने विजय मिळवत साखळी फेरीची सांगता विजयाने केली. दिल्लीचा यष्टीरक्षक ऋषभ पंतने संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली, त्याने नाबाद अर्धशतक झळकावलं.
 
 
३८ चेंडूत नाबाद ५३ धावांची धडाकेबाज खेळी करणाऱ्या ऋषभने विरेंद्र सेहवागला मागे टाकलं आहे. त्याच्या या झंजावाती खेळीत २ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश होता. दिल्ली संघाकडून आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत ऋषभ पंत पहिल्या क्रमांकावर आला आहे. 
दिल्लीकडून आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार लगावणारे फलंदाज –
ऋषभ पंत – ८८ षटकार
विरेंद्र सेहवाग – ८५ षटकार
श्रेयस अय्यर – ६७ षटकार