धावत्या कारने घेतला पेट ,पती पत्नी जखमी
   दिनांक :05-May-2019
कारचा टायर फुटल्याने लागली आग
आरंभा टोल नाक्यावरील घटना
 
गिरड: समुद्रपुर तालुक्यातील नागपूर चंद्रपूर महामार्गावरील आरंभा टोलनाक्या जवळ धावत्या कारने पेट घेतला.यात कारमधील पती,पत्नी किरकोळ जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

 
 
 
प्राप्त माहितीनुसार सायंकाळच्या सुमारास नागपूर येथील अविनाश घटे , पत्नी तृप्ती घटे आणि इंदूबाई प्रकाशे सह एका वर्षाच्या मुला सोबत कारने घुघुस येथे जात होते.आरंभा टोल नाक्याजवळ अचानक गाडीचे टायर फुटले आणि गाडीने पेट घेतला.घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी जखमींना रुग्णवाहिकेने नागपूर येथे रवाना केले. या वेळी त्याच्या न सर्तकते ने व नागरीकांचा सहकार्याने कार मधिल लोक थोडक्यात बचावल्याची
नागरिकांनी टँकरच्या मदतीने आग विजवत जाम महामार्ग पोलिस कर्मचारी बंडु डडमल,नागेश तिवारी,दीनेश धवने,पंकज वैद्य,राहुल कुमरे.देवैद्र घुसे,दिलीप वांदिले यांनी वाहतूक सुरळीत केली.