श्रीलंका संघाने इको फ्रेंडली जर्सीचे केले अनावरण; पहा जर्सीचा प्रवास

    दिनांक :05-May-2019
कोलंबो, 
 
इंग्लंड आणि वेल्स येथे होऊ घातलेल्या वर्ल्ड कप स्पर्धेला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या स्पर्धेसाठी श्रीलंका संघाने नुकतीच त्यांच्या जर्सीचे अनावरण केले. ही जर्सी पूर्णपणे टाकाऊ पासून टिकाऊ या तत्वावर तयार करण्यात आली आहे. समुद्रातून गोळा केलेल्या प्लास्टिकपासून ही जर्सी तयार करण्यात आली असून श्रीलंकेच्या या इको फ्रेंडली जर्सीचे सर्वत्र कौतुक होत आहे. भारतीय संघानेही मागील काही महिन्यांपूर्वी अशाच इको फ्रेंडली जर्सीचे अनावरण केले होते. 
 
श्रीलंकेच्या निवड समितीने वर्ल्ड कप स्पर्धेत संघाचे नेतृत्वा दिमुथ करुणारत्नेकडे सोपवले आहे. विशेष म्हणजे गेल्या चार वर्षांमध्ये करुणारत्ने एकही एकदिवसीय सामना खेळलेला नाही. या संघात काही माजी कर्णधारांचा समावेश आहे. त्याचबरोबर संघातील अनुभवी खेळाडूंना डावलून करुणारत्नेला संघाचे कर्णधारपद निवड समितीने दिले आहे.
 
 
 पहा जर्सीचा प्रवास: