शेजाऱ्यांसाठी तैमूर ठरतोय डोकेदुखी..!
   दिनांक :05-May-2019
अभिनेता सैफ अली खान आणि करिना कपूर खान यांचा मुलगा तैमूर अली खान याची लोकप्रियता दिवसें-दिवस वाढत चालली आहे. पण त्याची ही लोकप्रियताच त्याच्या शेजाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. इतकी की, हे शेजारी थेट पोलिस ठाण्यात पोहोचले. त्यांनी तैमूर अली खानबद्दल नाही पण त्याचे फोटो घेण्यासाठी गोंधळ घेणाऱ्या पापाराझींविरोधात तक्रार दाखल केली.
 

 
 
तैमूरचे फोटो घेण्यासाठी रोज संध्याकाळी या बिल्डींगसमोर जणू पापाराझींची जत्रा भरते. त्यांच्याकडून होणारा गोंधळ, आवाज यामुळे बिल्डिंगमधील सगळेच वैतागले. अखेर या रोजच्या कटकटीला कंटाळून बिल्डिंमधील लोकांनी पापाराझींविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. सुरुवातीला सैफनेच ही तक्रार दाखल केल्याचे मानले गेले. पण अलीकडे एका मुलाखतीत खुद्द सैफने याला नकार दिला होता.