परवाड्यात व्यापाऱ्याच्या घरी सशस्त्र दरोडा
   दिनांक :06-May-2019
परतवाडा,
अमरावती जिल्ह्यातील परतवाडा शहरातील कश्यप पेट्रोल पंप समोर राहणारे ऑईल मिल संचालक व व्यापारी विवेक मुरलीधर अग्रवाल यांच्या घरी सोमवारीच्या मध्यरात्री २ च्या सुमारास सहा अज्ञात दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा घातला. या घटनेने जिल्हात खळबळ उडाली आहे. 
 
 
दरोडेखोरांनी घरात घुसून अग्रवाल कुटुंबातील ४ सदस्यांना जिवे मारण्याची धमकी देत रोख रक्कम व दागिन्यासह एकूण 20 लाखांचा ऐवज लंपास केल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक आपल्या चमूसह घटनास्थळी दाखल झाले. श्वान पथक, ठसे तज्ज्ञ घटनास्थळी पोहचले होते. पुढील तपास वेगाने सुरू आहे.