इंग्लंडच्या राजघराण्याला मिळाला नवा वारस
   दिनांक :06-May-2019
- मेगन मार्केलला पुत्ररत्न
  
 
लंडन,  
प्रिन्स हॅरीची पत्नी मेगन मार्केलने बाळाला जन्म दिला आहे. या बाळाच्या जन्मामुळे ब्रिटनच्या राजघराण्याला नवा वारस मिळाला आहे. आज सोमवारी मेगन मार्केल शाही रुग्णालयात पोहचल्यानंतर काही वेळातच तिने मुलाला जन्म दिला. मेगन मार्केलच्या बाळाचे जन्म झाल्यानंतर वजन ७ पाऊंड इतके होते असेही समजते आहे. बाळ आणि त्याची मेगन यांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती प्रिन्स हॅरीने दिली आहे. आज सकाळी आम्हाला मुलगा झाला हे देखील त्याने प्रसारमाध्यमांना सांगितले आहे.
 
मेगन आणि मी आई बाबा झालो ही बाब खूप आनंददायी आहे. मी आता चंद्रावर आहे असेच मला वाटते आहे अशी प्रतिक्रिया प्रिन्स हॅरीने दिली. प्रिन्स विल्यम आणि मेघन मार्केल यांनी मे २०१८ मध्ये विवाह केला होता. या विवाहाची जगभर चर्चा झाली होती. तसेच, या विवाहासाठी जगभरातील देशांतून पाहुणे उपस्थित होते. इंग्लंडच्या राजघराण्याला नवा वारस मिळणार असल्याची बातमी मुद्दामहून गुप्त ठेवण्यात आली होती. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच राजघराण्याला वारस मिळणार असल्याची बातमी प्रसारमाध्यमांतून आली होती.