विचार व कृती सुधारण्यासाठी सुसंस्काराची गरज : नीता मुंदडा
   दिनांक :06-May-2019
मंगरूळनाथ,
विचार व कृती चांगल्या होण्यासाठी संस्कारांची गरज असते. भारतीय शास्त्राप्रमाणे प्रत्येक कृतीच संस्कारयुक्त असली पाहिजे. मुलांनो, तुम्हाला चांगली व्यक्ती बनायचे असल्याने स्वतःवर चांगले संस्कार करून घेण्याचा प्रयत्न करा. चांगले संस्कार यांची काही उदाहरणे पुढे देत आहोत.सकाळी लवकर उठणे, आई-वडील अन् मोठी माणसे यांना नमस्कार करणे, सर्वांशी नम्रतेने अन् प्रेमाने वागणे, स्वच्छता राखणे, नीटनेटके रहाणे, प्रतिदिन शाळेत जाणे,गृहपाठ वेळच्या वेळी करणे, आईला घरकामात साहाय्य करणे इत्यादी सुसंस्कार आचरणात आणले पाहिजे. संस्कार करणे म्हणजे चांगल्या सवयी लावणे व वाईट सवयी काढून टाकणे होय, असे मत अमरावती येथील प्रशिक्षीका निता मुंदडा यांनी व्यक्त केले. 

 
 
मंगरुळपीर येथील श्री चारभुजानाथ मंदिरात गिता परिवाराच्या वतीने चारभुजानाथ नित्ययोग मंडळाचे अध्यक्ष द्वारकादास बाहेती यांच्या अध्यक्षतेत सुसंस्कार शिबिर आयोजित करण्यात आले. दररोज संध्याकाळी या शिबिरात एकुण 55 शिबिरार्थ्यांनी सहभाग घेतला सहभागी शिबिरार्थींना सुसंस्कार, विज्ञान, आरोग्य, व्यक्तिमत्व विकास, अध्यात्म या विषयावर माहीती देण्यात आली. तसेत प्रार्थना, रामरक्षा स्तोत्र, सुर्यनमस्कार, आत्मविकास, झुबा (नृत्या अंतर्गत असलेला व्यायाम) शिकविण्यात आला. आयोजकांच्या वतिने नाश्ता व चहाची व्यवस्था केली होती. व्यक्तीमत्व विकास या विषयावर विशेष कार्यशाळा घेण्यात आली. 28एप्रिल रोजी समारोपीय कार्यक्रमाप्रसंगी दहा दिवसाात शिकविलेल्या उपक्रमाचे प्रात्यक्षिक शिबिरार्थ्यांनी सादर केले.
 
मुले मुली चांगले संस्कारीत झाल्याचे पाहुन पालकांनी समाधान व्यक्त केले.त्या वेळी राजस्थानी वरिष्ठ महीला मंडळाच्या वतीने विविध वस्तु सस्नेह भेट देवुन शिबिरार्थींचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लता बजाज, मिनाक्षी बाहेती, मंगला बंग, लता बंग, मधु लोहिया,कल्पना जाखोटीया, ऐश्‍वर्या छल्लाणी यांचेसह राजस्थानी वरिष्ठ महिला मंडळ, जेसीआय मंडळ,राजस्थानी महीला मंडळ,चारभुजानाथ नित्ययोग मंडळाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे संचालन रुषी काबरा,अक्षद व सृृष्टी बाहेती, रुचि राठी यांनी केले तर आभार प्रदर्शन यश बाहेती यांनी केले. शिबिरात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना वरिष्ठ महिला मंडळां द्वारे बक्षीस वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाला राजस्थानी वरिष्ठ महिला मंडळ राजस्थानी महिला मंडळ चारभुजानाथ नित्ययोग मंडळ जेसीआय मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.