नळयोजनेची पाईपलाईन फोडणार्‍या कंपनीविरुद्ध कारवाई करा
   दिनांक :06-May-2019
- माजी ग्रा.पं. सदस्य बाळा सावंत यांची मागणी 

 
 
मालेगाव, 
जीओ कंपनीच्या केबल खोदकामामुळे मालेगाव शहरातील पाणी पुरवठा नळ योजनेचे पाईपलाईन फुटल्याने शहरातील पाणी पुरवठा बंद पडल्याने जीओ कंपनीविरुद्ध नगर पंचायत प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी माजी ग्रापं सदस्य बाळा सावंत यांनी केली आहे.
 
मालेगाव शहरात उन्हाळ्यात पाण्याची अत्यंत आवश्यकता असतांना मात्र, गेल्या काही दिवसापासुन पाईपलाईन फुटल्याने शहरातील पाणीपुरवठा विस्कळी झाला होता. जीओ कंपनीच्या वतीने शहरात केबल टाकण्याचे काम सुरू आहे व त्यासाठी नालीचे खोदकाम सुरू आहे. या खोदकामामुळे पाणीपुरवठा योजनेचे पाईप फुटल्या गेले आहे. त्यात तहसील कार्यालयासमोर व इतर दोन ठिकाणी पाईप फुटल्याने नळयोजनेचा पाीपुरवठा विस्कळीत झाला. त्यामुळे शहरात पाणी टंचाईसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. तर नळयोजनेद्वारा होणार्‍या पाणीपुरवठ्या अभवी प्रभाग 3,4,5 व 6 तसेच प्रभाग 2 मध्ये पाणी टंचाई निर्माण झाली व त्यामुळे नागरिकांचे अतोनात हाल होत आहे, याला जबाबदार जीओ कंपनी असून, या कंपनीविरुद्ध नगर पंचायत प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी माजी ग्रांप सदस्य बाळासावंत यांनी केली आहे.
 
प्रस्तुत प्रतिनिधीला अधिक माहीती देतांना जीओ कंपनी तर्फे केबल टाकण्याच्या कामात मनमानी करीत आहेत. काम करण्यासाठी सबंधित विभागाची परवानगी घेतली आहे किंवा नाही याची चौकशी करुन पाईपलाईन फोडल्या बद्दल कंपनी विरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. उन्हाळ्यात शहरातील नागरिकांना नियमती पाणी पुरवठा व्हावा, यासाठी एकीकडे नगरपंचायत शर्थीचे प्रयत्न करीत आहे. पाणीपुरवठ्यासाठी पाण्याचा भरपुर साठा आहे. परंतु, फुटलेल्या पाईपलाईनमुळे व पाईपलाईन दुरुस्तीसाठी लागणार्‍या विलंबामुळे मात्र, शहरात पाणी पठ्ठ्यासाठी व्यत्यय येत आहे व त्यामुळे जीओ कंपनीवर कारवाई झालीच पाहीजे, अशी मागणी बाळा सावंत यांनी केली आहे.