तुर्कीच्या किनाऱ्याजवळ बोट बुडून ७ ठार
   दिनांक :06-May-2019
इस्तंबूल,
तुर्कीमधून युरोपात आश्रय घ्यायला येत असलेल्या शरणार्थ्यांची बोट बुडून 7 जणांना जलसमाधी मिळाली आहे. या रबरी बोटीमधून 17 जण प्रवास करत होते. तुर्कीच्या बालिकेसीर प्रांतातील अयावलिक जिल्ह्यातल्या एजियन किनाऱ्याजवळ शुक्रवारी ही दुर्घटना घडली, असे तुर्कीच्या तटरक्षक दलाने सांगितले आहे. या शरणार्थ्यांपैकी 5 जणांना वाचवण्यात यश आले आहे. तर .
 
 
 
युरोपात आश्रय घेण्यासाठी शरणार्थ्यांकडून एजियन समुद्राच्या मार्गाचा नेहमीच वापर केला जातो. तुर्की आणि युरोपिय संघामध्ये 2016 साली झालेल्या करारामुळे हा शरणार्थ्यांच युरोपाकडे या सागरी मार्गाने असलेला ओघ कमी झाला आहे. या वर्षी जानेवारीपासून तब्बल 7,100 शरणार्थ्यांनी या मार्गाने युरोपात जाण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र रबरी बोटींमधून दाटीवाटीने बसून प्रवास करताना झालेल्या अपघातात हजारो शरणार्थ्यांना आतापर्यंत जीव गमवावा लागला आहे.