अभिनेत्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
   दिनांक :06-May-2019
मुंबई : लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याच्या महिला ज्योतिषाच्या तक्रारीवरून दूरचित्रवाणी अभिनेत्यावर ओशिवारा पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. आरोपीने बलात्काराचा व्हिडीओ बनवून ब्लॅकमेल करत पैसे उकळल्याचा दावाही पीडितेने केला आहे.
पोलिसांनुसार, पीडितेची ऑक्टोबर 2016 मध्ये डेिंटग अॅप्लिकेशनद्वारे आरोपीशी भेट झाली. आरोपीने एकदा महिलेला फ्लॅटवर भेटण्यासाठी बोलावले असता तिला लग्न करण्याचे वचन दिले. यावेळी आरोपीने तिला नारळपाणी प्यायला दिले. गुंगी आल्यानंतर आरोपीने तिच्यावर बलात्कार केला आणि मोबाईल व्हिडीओही बनवला. याद्वारे आरोपी पीडितेला ब्लॅकमेल करून पैसे उकळत होता. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करत अधिक पैशांची मागणी करायचा, असे पीडितेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, पोलिसांनी आरोपीविरोधात बलात्कार, बळजबरीने पैसे उकळणे यासह अनेक कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.