एमी जॅक्सनचा लंडनमध्ये साखरपुडा
   दिनांक :06-May-2019
बॉलिवूड आणि टॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री एमी जॅक्सने यावर्षी जानेवारीत बॉयफ्रेंड जॉर्ज पानायियोटौ याच्यासोबतसोबत गुपचूप साखरपुडा उरकला होता. आता तिने मित्र आणि कुटुंबीयांसमोर पुन्हा एकदा साखरपुडा केला. लंडनमध्ये हा साखरपुडा पार पडला. यासाठी एका ग्रॅण्ड पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. 
 
 
ब्रिटीश ब्युटी म्हणून प्रसिद्ध असलेल्या एमी जॅक्सनने चालू वर्षाच्या पहिल्याच दिवशी साखरपुडा केल्याची खुशखबर सोशल मीडियावर चाहत्यांसह शेअर केली होती. यावेळी ती दोन महिन्यांची गर्भवती होती. बाळाला जन्म दिल्यानंतर एमी व जॉर्ज लग्न करणार आहेत. म्हणजेच, पुढील वर्षी २०२० मध्ये हे जोडपं लग्न करणार आहे.
 
दोघांनीही डेस्टिनेशन वेडिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रीसमध्ये हे लग्न होईल, असे कळतेय. एमीचा मंगेतर जॉर्ज हा ब्रिटीश प्रॉपर्टी डेव्हलपर अँड्स पानायिटूचा मुलगा आहे. त्याचा ‘क्वीन सिटी’ नामक एक अलिशान नाईटक्लब आहे. एमीला डेट करण्यापूर्वी जॉर्ज पॉप गायिका शेरिल कोलला डेट करत होता. पण कालांतराने दोघांचेही ब्रेकअप झाले आणि जॉर्जला एमी मिळाली.