‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’चा नवा विक्रम; लवकरच गाठणार ४०० कोटींचा पल्ला
   दिनांक :06-May-2019
मार्वेल स्टुडिओचा ‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’ हा चित्रपट ग्लोबल बॉक्सऑफिसवर चांगली कमाई करतोय. भारतीय बाजारात या चित्रपटाने रविवारपर्यंत ३७२.५६ कोटींची कमाई केली आणि जगभरात हा आकडा १५३ अब्जांवर पोहोचला. ‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’ने रोज नव्या विक्रमांना गवसणी घालत असताना आता या चित्रपटाने ‘टायटॅनिक’ या चित्रपटाच्या वर्ल्ड वाईड कमाईचा रेकॉर्डही आपल्या नावावर केला आहे.
 
 
 
‘टायटॅनिक’ हा कधीकाळी जगातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता. त्याकाळात या चित्रपटाने १५३ अब्ज रूपयांचा बिझनेस केला होता. पुढे ‘अवतार’ या हॉलिवूडपटाने ‘टायटॅनिक’ला मागे टाकले आणि सर्वाधिक कमाई करणा-या चित्रपटांच्या यादीत ‘टायटॅनिक’ दुसऱ्या क्रमांकावर फेकला गेला. आता ‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’ने १५३ अब्ज कमाईसह ‘टायटॅनिक’ला तिसऱ्या क्रमांकावर ढकलले आहे. आता ‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’ जगातील सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट बनला आहे. शिवाय जगातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनण्याकडे त्याची घोडदौड सुरु आहे.