५ ०लाख ७९ हजार रुपयाचा पान मसाला,सुगंधित तंबाखू जप्त
   दिनांक :06-May-2019
वाहन चालक अटकेत
 
समुद्रपूर: पोलिसांनी महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित पान मसाला,सुगंधित तंबाखू याचा २० लाख ७९ हजार रुपयाच्या साठ्या सह ५० लाख ७९ हजार रुपयाचा मुद्देमाल केला जप्त.
 
 
 
प्राप्त माहितीनुसार ४ मे ला समुद्रपुर पोलिसांना एक ट्रक नागपूर येथून चंद्रपूरकडे महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधित तंबाखूची वाहतूक करणार असल्याबाबत गुप्त माहिती मिळाली. या वेळी
ठाणेदार प्रवीण मुंडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे अरविंद येनूरकर यांच्या पथकाने नागपुर चंद्रपूर मार्गावरील आरंभा टोल नाक्यावर सापळा रचून वाहन क्रमांक MH 34 BG 4116 ला थांबवुन गाडीची पाहणी केली असता त्यात एकूण ८२ पोत्यामध्ये ईगल तंबाखू ,माझा सुगंधित तंबाखू तसेच मालिकचंद रॉयल पान मसाला असा एकूण २० लाख ८९ हजार रुपयाचा माल आढळून आला. त्यावेळी वाहन चालकास महाराष्ट्र शासनाने सुगंधित तंबाखू मसाला निर्बंध घातले असून उत्पादन ,वाहतूक ,साठा,वितरण यावर बंदी घातलेली आहे असे सांगून त्याच्याकडे सदर मालवाहतूक करण्याचा परवाना आहे काय ? याबाबत विचारणा केली असता त्याने त्याच्याकडे असा कोणताही परवाना नसल्याचे सांगितले.या वर पोलिसांनी वाहना सह ५ ० लाख ७९ हजार रुपयाची मुद्देमाल जप्त करीत वाहन चालक नजमुद्दिन खान रा.पडोली जिल्हा चंद्रपूर यास ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.पोलिसांनी कलम 188,273,274,328 भारतीय दंड विधान अन्वये गुन्हा दाखल केला .हि कारवाई पोलीस अधीक्षक बसवराज तेली ,उपविभागीय पोलिस अधिकारी टेळे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार प्रवीण मुंडे,पोलीस उपनिरीक्षक दिपेश ठाकरे, पोलीस हवालदार अरविंद येनूरकर, पोलीस नाईक रवी पुरोहित, पोलीस शिपाई आशिष गेडाम, पोलीस शिपाई वैभव चरडे आदी सह पोलीस कर्मचाऱ्यांनी केली.