परशुराम जयंती निमित्य ब्राम्हण युवकांनी केले रक्तदान

    दिनांक :06-May-2019
शेगाव: मानवी रक्ताला दुसरा कोणताही पर्याय नाही हे सिध्द झालेलेच आहे त्यामुळे रक्तदान करणे हा एकमेव मार्ग माणसांचे प्राण वाचवण्यासाठी उपलब्द आहे हिच गोष्ठ आज परत एकदा ब्राह्मण युवकांनी सिध्द केली
भगवान परशुराम जन्मोत्सवा निमीत्त ब्राह्मण युवक मंडळाने दरवर्षि प्रमाणे यंदाही रक्त दानाचा संकल्प सोडला आज 21ब्राह्मण युवकांनी रक्त दान केले ऐन याच वेळी स ईबाई मोटे उपजिल्हा सामान्य रुग्णालय शेगांव मधे अत्यंत ताबडतोब रक्ताची गरज असलेले पाच पेशंन्ट भरती होते त्यांच्या जवळ दाते नव्हते त्यातील तीन भगिनींचे सिझर अवश्यक होते रक्त दिल्या शिवाय सिझर होणे शक्य नव्हते आणी सिझर झाल्याशिवाय बाळ व बाळांतीणीची सुटका होत नव्हती अशा कठीण प्रसंगात ब्राह्मण युवकांनी मदतीचा हात दिला व या भगिंनीनसाठी स्वत:चे रक्त देत माणुसकीचा धर्म निभावला.  
 

 
 
विमल एकनाथ पोटे ही तेल्हारा तालुक्यातील भगिनी अशीच रक्तामुळे अडली होती तीचे वडील पैसैघ्या पण रक्त द्या म्हणत होते पण सरकारी रक्त पेढीला रक्ताच्या बदल्यात रक्त पाहीजे काय करावे अशा जिवाची घालमेल झालेल्या वडिलांना ब्राह्ममण युवकांनी दिलासा देत रक्ताची भरपाई करुन दिली त्यावेळी त्यांनी या युवका प्रती अत्यंत भरल्या डोळ्यांनी आपली ऋतज्ञता व्यक्त केली. त्यामुळे हि गोष्ठ परत सिद्ध झाली की रक्त दान सर्वात श्रेष्ठ दान आहे आज रक्त दानासाठी नागरीकांना विशेषत:युवकांना जाग्रुक आणी प्रोत्साहीत केलेच पाहीजे असे शेगांव न पचे पाणी पुरवठा सभापती पवन महाराज शर्मा यांनी म्हटले आहे तर शेगांव रुग्णालयात रक्ताची मागणी खुप जास्त असल्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तदात्यांची गरज आहे असे रुग्णसेवा समीतीचे सदस्य प्रमोद काठोळे यांनी म्हटले तसेच यावेळी क्रिष्णा रवी शर्मा चेतन श्रीकांत व्यास सागर मोहन शर्मा गोविंद सत्यनारायण शर्मा शुभम नंदकिशोर शर्मा क्रिष्णाकुमार के शर्मा रितीग अरुण कुमार शर्मा अजय अशोक शर्मा क्रीष्णा जगदिश तिवारी भरत राजेन्द्र शर्मा मोहीत राजकुमार शर्मा प्रितम ओमप्रकाश शर्मा विनोद रामेश्वर शर्मा सोनूभाऊ लाडोलीया मोनु देशपांडे अभिषेक दिलीप शर्मा आशिष संतोष शर्मा प्रशांत कुळकर्णी गिरीश रवी कुमार शर्मा सुरेश स्वामी संकेत खेतान ईत्यादि युवकांनी रक्तदान केले त्यांना प्रोत्साहीत करण्यासाठी अरुणसेठ शर्मा परमानंद शर्मा हे पुर्ण वेळ उपस्थित होते ह्या घटनेतून एकच संदेश सर्वांना जातो कि आपण एकाच इश्वराची लेकरे असुन कोणतीही जातपात न मानता माणुसकिने माणसांशी वागावे आणी जिवन वाचवण्यासाठी रक्तदान जरूर करावे.