cbse 10th result; १३ विद्यार्थ्यांना ५०० पैकी ४९९ गुण
   दिनांक :06-May-2019
नवी दिल्ली,
 
सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनने (सीबीएसई) इयत्ता दहावीचे निकाल घोषित केले आहेत. इयत्ता १२वीच्या निकालाप्रमाणेच आज इयत्ता १०वीचे निकाल सुद्धा अचानक घोषित करण्यात आला.
 
 
 
आज निकाल घोषित करण्याबाबत सीबीएसईने कोणतीही पूर्वसूचना दिली नव्हती. मात्र, आज अचानक दुपारी ३ वाजता निकाल लावणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले. असे असले करी सीबीएसईने २ वाजता हे निकाल घोषित केले. विद्यार्थी इयत्ता १०वीचा निकाल या साइटवर भेट देऊन पाहू शकतात.
यंदा, इयत्ता १० वीमध्ये एकूण १३ विद्यार्थ्यांनी ५०० पैकी ४९९ गुण मिळवून अव्वल स्थान प्राप्त केले आहे. तर, २४ विद्यार्थ्यांनी ५०० पैकी ४९८ गुण मिळवले आहेत.