सीबीएसईचा दहावीचा निकाल जाहीर
   दिनांक :06-May-2019
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या दहावीच्या परिक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी पास होण्याचे प्रमाण 4.40 टक्क्यांनी वाढले आहे. यंदा दहावीचा निकाल 91.1 टक्के लागला आहे. पास होण्याचे प्रमाण दरवर्षी कमी होण्याची 2014 पासूनची प्रथा यंदा खंडित झाली आणि गेल्या वर्षीच्या तुलनेत चांगला निकाल लागला आहे. अर्थात, 2017 चा विचार केला तर यंदा लागलेला निकाल तसा कमीच आहे. 2017 मध्ये यंदाच्या 91.1 टक्क्यांच्या तुलनेत जास्त म्हणजे 93.06 टक्के इतके विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते.
 

 
परिक्षेसाठी बसलेले विद्यार्थी सीबीएसई बोर्डाच्या वेबसाईट www.cbse.nic.in. वर जाऊनही निकाल पाहू शकता. याशिवाय cbseresults.nic.in आणि results.nic.in. या संकेतस्थळांवरही विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहता येणार आहे. दोनच दिवसांपूर्वी सीबीएसईच्या १२ वीच्या परिक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. निकाल दुपारी तीन वाजता जाहीर करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं होतं, मात्र त्याआधीच दुपारी २ वाजता सीबीएससीच्या अधिकृत संकेतस्थळावर निकाल जाहीर करण्यात आला.
असा पाहा निकाल –
१. cbse.nic.in या वेबसाइटवर जा
२. CBSE 10th Result 2018
३. ही लिंक शोधा व तिच्यावर क्लिक करा
४. आपला रोल नंबर भरा
५. तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल, तो डाउनलोड करा म्हणजे तो तुम्हाला नंतरही उपयोगी येऊ शकेल.