आजचे राशी भविष्य, दि. ०६ मे २०१९
   दिनांक :06-May-2019

 

मेषकामात व्यस्त राहाल. कामात सन्मान मिळेल. मेहनतीने धनलाभ होईल. कामं पूर्ण होतील. दिवस चांगला आहे. नवीन ओळखी होण्याची शक्यता आहे. सक्रिय राहाल. अविवाहितांसाठी दिवस चांगला आहे. प्रवासाचा योग आहे.

वृषभअनेक दिवसांपासून रखडलेली कामं पूर्ण होतील. कौटुंबिक संबंध मधुर राहतील. स्वत:ची इमेज बदलण्याची संधी मिळेल. दिवस उत्साही आणि मनोरंजनात्मक राहील. कौटुंबिक गोष्टींकडे लक्ष द्यावे लागेल. वैवाहिक लोकांसाठी दिवस चांगला आहे. 

मिथुन - नोकरीत समस्या होऊ शकते. दररोजच्या कामात समस्या जाणवतील. हट्टीपणामुळे वाद होण्याची शक्यता आहे. अधिक विचार करण्यात वेळ घालवू नका. अचानक समस्या वाढू शकतात. धावपळ होईल. काही कामात लोकांची मदत मिळणार नाही. तब्येतीत चढ-उतार राहील. डोकेदुखी, डोळ्यांची जळजळ होऊ शकते.

कर्क - घाई-घाईत कामं करु नका. वायफळ खर्च होऊ शकतो. नोकरी, व्यवसायात समस्या वाढू शकतात. पैशांच्या बाबतीत सावध राहा. ऑफिसमध्ये तणावपूर्ण स्थिती राहील. पोटासंबंधी रोग होण्याची शक्यता आहे.

सिंह - कुटुंबात सुख-शांती राहील. चांगल्या मित्रांची ओळख होईल. ऑफिसमध्ये काही लोक गुप्तपणे तुमची मदत करतील. जोडीदाराकडून आर्थिक मदत होईल. सामाजिक कामात सन्मान मिळेल. विवाहितांना चांगला वेळ मिळेल.

कन्या - नोकरी, व्यवसायात लाभ होईल. दिवस चांगला आहे. प्रगतीसाठी अधिक मेहनत करावी लागेल. स्वत:च्या फायद्याचा विचार करा. जोडीदारावर रागवू नका. कोणावरही तुमच्या भावना थोपवू नका. जोडीदारावर अधिक खर्च होऊ शकतो. दुसऱ्यांना नाराज न करता चतुराईने काम करा.

तुळ - व्यवसायात फायदा कमी होईल. बदलीची शक्यता आहे. दिवस कठीण असेल. कामाच्या ठिकाणी लक्ष विचलीत होऊ शकते. वायफळ कामात लक्ष राहील. अविवाहितांच्या प्रेमसंबंधांमध्ये तणाव राहील.

वृश्चिक - व्यवसाय वाढेल. सहकाऱ्यांची मदत मिळेल. नवीन लोकांशी ओळख होईल. दररोजच्या कामातून काही वेळ मिळू शकतो. समस्या संपतील. रखडलेली कामं पूर्ण होतील. दिवसभर थकवा राहील. आराम करा अन्यथा समस्या उद्धभू शकतात.

धनु - कोणताही नवीन व्यवहार करु नका. दिवसाची सुरुवात ठिक राहणार नाही. ईच्छा नसतानाही पैसे खर्च करावे लागतील. कोणतीही योजना गुप्त ठेवा. कुटुंबातील लोक कठीण परिस्थितीत टाकू शकतात. डोकेदुखी आणि पोटदुखी होऊ शकते.

मकर - दररोजची कामं पूर्ण होतील. विचार करुनच कोणताही निर्णय घ्या. पैशांच्या स्थितीत सुधारणा होईल. कुटुंब, समाजात तुमचे महत्त्व वाढेल. जोडीदारासोबत दिवस चांगला जाईल. तब्येतीत चढ-उतार जाणवेल. जेवणात मसालेदार पदार्थ खाऊ नका.

कुंभ - व्यवसायात काही बदल करु नका. जसे काम चालू आहे तसेच सुरु ठेवा. कोणताही नवीन निर्णय घेऊ नका. महागड्या वस्तूंची खरेदी होऊ शकते. हुशारीने पैसे खर्च कराल. प्रेमसंबंधांसाठी दिवस चांगला आहे. थकवा आणि अपूर्ण झोपेमुळे समस्या होऊ शकतात.

मीन - आर्थिक तंगी संपेल. ऑफिसमध्ये अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. कामं पूर्ण होतील. अचानक धनलाभ होऊ शकतो. चांगल्या लोकांच्या संगतीमुळे फायदा होईल. मुलांकडून चांगली बातमी मिळेल.