'...म्हणून रसलची मैदानावरच झाली चिडचिड'

    दिनांक :06-May-2019
IPL 2019, 
वानखेडे मैदानावर झालेल्या शेवटच्या साखळी सामन्यात मुंबईने कोलकाताला ९ गडी राखून पराभूत केले. कोलकाताने दिलेले १३४ धावांचे आव्हान कर्णधार रोहित शर्माच्या नाबाद अर्धशतकाच्या बळावर मुंबईने सहज पूर्ण केले. या विजयासह मुंबई गुणतालिकेत अव्वल स्थानी विराजमान झाली. पराभवामुळे कोलकाताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले, तर हैदराबादला प्ले-ऑफ्स फेरीत स्थान मिळाले.
 

 
या सामन्यानंतर ईशान किशन याला दिलेल्या अनौपचारिक मुलाखतीत क्विंटन डी कॉकने काही गोष्टी स्पष्ट केल्या. मुंबई आणि कोलकाता यांच्यातील सामन्यात कोलकाताला विजय आवश्यक होता. कोलकाताला प्रथम फलंदाजी करताना फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. त्यांनी केवळ ११३ धावाच केल्या. त्यामुळे त्यांना लवकर मुंबईचे गडी बाद करणे आवश्यक होते. पण मी रसलच्या गोलंदाजीवर मोठे फटके खेळण्यास सुरुवात केली आणि झटपट धावा जमवू लागलो. कदाचित या गोष्टीमुळे रसलची मैदानावरच चिडचिड झाल्याचे दिसले, असे डी कॉक म्हणाला.