सीबीएसई निकाल; स्मृती इराणींच्या मुलीला मिळाले 'एवढे' टक्के
   दिनांक :06-May-2019
नवी दिल्ली,
 
केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाच्या 10वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. सीबीएसईनं अधिकृत वेबसाइट cbse.nic.in, cbseresults.nic.inवर निकाल दिला आहे. या दहावीच्या परीक्षेत 13 विद्यार्थी टॉपर ठरले आहेत. या सर्वच विद्यार्थ्यांनी 500 गुणांपैकी 499 गुण मिळवले आहेत.
 
 
विशेष म्हणजे या परीक्षेला बसलेल्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या मुलीला 10वीच्या परीक्षेत 82 टक्के मिळाले आहेत. स्मृती इराणींच्या मुलीचं नाव जोइश इराणी आहे. तत्पूर्वी स्मृती इराणींचा मुलगा जोहर इराणीनं 12वीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डानं सीबीएसईची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 29 मार्चपर्यंत आयोजित करण्यात आली होती. तर सीबीएसईची 12वीची परीक्षा 15 फेब्रुवारीपासून 3 एप्रिलपर्यंत सुरू होती.