‘सेक्रेड गेम्स 2’चा प्रोमो प्रदर्शित; दिसणार 'हे' कलाकार
   दिनांक :06-May-2019
अभिनेता सैफ अली खान आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांची भूमिका असलेली नेटफ्लिक्सची सीरिज ‘सेक्रेड गेम्स’ प्रचंड गाजली. या पहिली सीरिज संपत नाही, तोच प्रेक्षक ‘सेक्रेड गेम्स’च्या दुस-या सीझनची आतुरतेने वाट बघत आहे. केवळ इतकेच नाही तर आम्हाला ‘सेक्रेड गेम्स 2’ पाहिजे, अशी मागणी प्रेक्षकांनी लावून धरली होती. याच प्रेक्षकांसाठी एक खास बातमी आहे. ती म्हणजे, ‘सेक्रेड गेम्स 2’चा प्रोमो प्रदर्शित झालाय.
 

 
‘सेक्रेड गेम्स 2’चा हा प्रोमो पाहिल्यानंतर चाहत्यांची उत्सुकता आणखी शिगेला पोहोचणार आहे. कारण ‘सेक्रेड गेम्स 2’मध्ये कल्की कोच्लिन आणि रणवीर शौरी या दोघांची एन्ट्री झालीय. सोमवारी नेटफ्लिक्सने ‘सेक्रेड गेम्स 2’चा प्रोमो रिलीज करत, चाहत्यांना सरप्राईज दिले. हा प्रोमो येताच व्हायरल झाला.
‘सेक्रेड गेम्स 2’च्या या नव्या प्रोमोत सैफ अली खान, नवाजुद्दीन सिद्दीकी, पंकज त्रिपाठी यांच्यासोबत रणवीर शौरी व कल्की कोच्लिन दिसतात. अद्याप ‘सेक्रेड गेम्स 2’ च्या रिलीज डेटची घोषणा झालेली नाही. ‘सेक्रेड गेम्स 2’मध्ये किती एपिसोड असणार, ते कधी टेलिकास्ट होणार, हे अद्यापही गुलदस्त्यात आहे.