स्कॉर्पिन पाणबुडी ‘वेला’चे जलावतरण
   दिनांक :06-May-2019
 
 मुंबई: अत्याधुनिक यंत्रणा आणि तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेली स्कॉर्पिन पाणबुडी ‘वेला’चे आज सोमवारी येथे जलावतरण करण्यात आले. या पाणबुडीच्या अनेक यशस्वी चाचण्या घेण्यात आल्या असून, त्यानंतर आज ती संरक्षण दलात समाविष्ट करण्यात आली. सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम असलेल्या माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि.ने (एमडीएल) सादर केलेली ही चौथी पाणबुडी आहे. सहा स्कॉर्पिन पाणबुड्यांच्या बांधणी आणि तंत्रज्ञान हस्तांतरणाकरिता एमडीएलने फ्रान्सच्या डीसीएनएस या कंपनीशी करार केला आहे. आज आम्ही नव्या पाणबुडीचे राष्ट्रार्पण केले आहे. ही पाणबुडी अतिशय अत्याधुनिक असून, समुद्राचे रक्षण करण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञााने ती सज्ज आहे, अशी माहिती एमडीएलच्या वरिष्ठ अधिकार्‍याने दिली.
या वर्गवारीतील पाचवी पाणबुडी लवकरच सादर केली जाईल. ती सुद्धा अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज असेल, असेही अधिकार्‍यांनी सांगितले.