...म्हणून तारा सुतारियाने सोडला 'कबीर सिंग'
   दिनांक :06-May-2019
अभिनेत्री तारा सुतारिया 'स्टुडंट ऑफ द ईयर २' मध्ये बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यास सज्ज झाली आहे. या सिनेमात ती टायगर श्रॉफ आणि अनन्या पांडेसोबत दिसणार आहे. याशिवाय ताराला कबीर सिंग सिनेमाची ऑफर देखील आली होती. हा सिनेमा दाक्षिणात्य चित्रपट अर्जुन रेड्डीचा रिमेक आहे. यात शाहिद कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा आता कियारा आडवाणीला मिळाला आहे.

 
ज्यावेळी ताराला 'कबीर सिंग'ची ऑफर आली तेव्हा 'स्टुडंट ऑफ द ईयर २'चे बरेच शूटिंग बाकी होते म्हणून तिला 'कबीर सिंग' सोडावा लागला. मात्र तरीही तारा स्वत:ला नशीबवान समजते कारण तिला त्यानंतर 'मरजावां' सिनेमा मिळाला. 
'मरजावां'मध्ये तारा ती सिद्धार्थ मल्होत्राच्या अपोझिट दिसणार आहे याशिवाय ताराची ‘आरएक्स 100’ सिनेमात वर्णी लागली आहे. ‘आरएक्स 100’ या तेलगू ब्लॉकबस्टर चित्रपटाचा रिमेक आहे. यात सिनेमातून सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी बॉलिवूडमध्ये पदार्पण करतोय.