माजी मुख्यमंत्र्यांनी युवकाच्या कानशिलात लगावली
   दिनांक :06-May-2019
संगरूर (पंजाब) ,
 
पंजाबमध्ये एका तरुणाने लोकसभा, विधानसभेमध्ये निवडून गेलेल्या उमेदवाराला त्याने काय काम केले हे विचारले असता, त्याला माजी मुख्यमंत्री राहिलेल्या महिला नेत्याने कानाखाली लगावल्याचा प्रकार घडला. यावरच न थांबता त्या तरुणाला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फरपटत दुसऱ्या बाजुला नेले.
 
 राजिंदर कौर या काँग्रेसचे उमेदवार केवल सिंह ढिल्लों यांच्या प्रचारासाठी रविवारी बुशैहरा गावात आल्या होत्या. यावेळी एका युवकाने त्यांना प्रश्न विचारायचा प्रयत्न केला. तेव्हा त्याला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गप्प बसविले. मात्र, तरुणाने पुन्हा प्रश्न विचारताच राजिंदर कौर यांचा पारा चढला. त्यांन थेट त्या युवकाच्या कानशिलातच भडकाविली आणि प्रचारसभेतून तडक बाहेर पडल्या.
 
राजिंदर कौर मंचावर आल्या होत्या यावेळी त्या युवकाने त्यांना तुम्ही या भागाच्या विकासासाठी काय केले, असा प्रश्न विचारला. य़ावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांना नंतर विचार असे सांगत शांत बसविले. प्रचारसभा झाल्यावर राजिंदर सिंह जायला लागल्या तेव्हा या तरुणाने, 'तुम्ही गेली 25 वर्षे या भागातील आमदार आहात, या काळात काय विकास केला?', असा प्रश्न विचारला. यावर राजिंदर कौर नाराज झाल्या. या युवकाचे नाव कुलदीप असे आहे.
 
याचवेळी कुलदीपने त्यांना रोजगाराविषयीही विचारले, यावर त्या मंचावरून खाली येत कुलदीपच्या कानाखाली मारली. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी कुलदीपला बाजुला नेले. वातावरण तापल्यानंतर तेथील लोकांना काँग्रेस उमेदवार, रोजिंदर कौर यांच्याविरोधात घोषणाबाजी देण्य़ास सुरुवात केली.