पर्पल कॅंपच्या शर्यतीत रबडा आघाडीवर

    दिनांक :07-May-2019
नवी दिल्ली,
डेव्हिड वॉर्नर व कॅगिसो रबाडा यांचा आयपीएल २०१९ मधील प्रवास साखळी फेरीतच संपुष्टात आला. पण सुरुवातीच्या समान्यांत चमकदार कामगिरीच्या जोरावर हे दोघे अनुक्रमे ‘ऑरेंज कॅप’ व ‘पर्पल कॅप’च्या प्रबळ दावेदारांमध्ये कायम आहेत.
 

 
वॉर्नरने सनरायजर्स हैदराबादतर्फे १२ सामन्यांत एक शतक व आठ अर्धशतकांच्या जोरावर ६९२ धावा फटकावल्या. त्यानंतर तो विश्वकप स्पर्धेच्या तयारीसाठी मायदेशी परतला. पण अद्याप आयपीएलमध्ये एका मोसमात सर्वाधिक धावा फटकावणाऱ्या फलंदाजाला मिळणारी आॅरेंज कॅप या आॅस्ट्रेलियन खेळाडूकडे आहे. वॉर्नरव्यतिरिक्त के. एल. राहुल (५९३) आणि आंद्रे रसेल (५१०) यंदाच्या मोसात आतापर्यंत ५०० पेक्षा अधिक धावा फटकावण्यात यशस्वी ठरले आहेत. 
सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजाला मिळणारी ‘पर्पल कॅप’ सध्या दिल्ली कॅपिटल्सचा गोलंदाज खांगीसो रबाडाकडे आहे. पाठदुखीमुळे त्याला दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने सावधगिरी बाळगताना मायदेशी परत बोलविले आहे.
रबाडाने १२ सामन्यांत २५ बळी घेतले आहेत. त्याला पर्पल कॅपसाठी सर्वात मोठे आव्हान त्याचा मायदेशातील सहकारी इम्रान ताहिरकडून आहे. ताहिरने चेन्नई सुपरकिंग्सचे प्रतिनिधित्व करताना २१ बळी घेतले आहेत.
प्ले-आॅफमध्ये स्थान मिळविणाºया चार संघांपैकी हैदराबादचा खलील अहमद व मुंबई इंडियन्सचा जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी १७, चेन्नईचा दीपक चाहरने १६ तर हैदराबादचा राशिद खान व मुंबई इंडियन्सचा लसिथ मलिंगा यांनी प्रत्येकी १५ बळी घेतले आहे. चमकदार कामगिरी करीत त्यांना पर्पल कॅप पटकाविण्याची संधी आहे. मात्र या खेळाडूंना मोठी कामगिरी करावी लागेल.