नायजेरियात ५ भारतीय खलाशांचे अपहरण; सुटकेसाठी प्रयत्न सुरु
   दिनांक :07-May-2019
नायजेरियात समुद्री चाच्यांकडून ५ भारतीय खलाशांचे अपहरण करण्यात आल्याचे माहिती परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विटद्वारे दिली. त्याचबरोबर नायजेरीयातील भारतीय उच्चायुक्तांना या खलाशांच्या सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.

 
स्वराज यांनी ट्विटमध्ये म्हटले की, माध्यमांतील वृत्तातून मला याची माहिती कळाली. त्यानंतर तत्काळ नायजेरीयातील भारतीय राजदूत अभय ठाकूर यांना याप्रकरणी लक्ष घालण्यास सांगण्यात आले आहे. नायजेरीयन सरकारशी चर्चा करुन या पाचही जणांच्या सुटकेसाठी प्रयत्न करण्याच्या सुचनाही त्यांना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर या प्रकरणाचा अहवाल तयार करुन आपल्याकडे पाठवण्याचेही आदेश दिले आहेत.