फॅनी वादळग्रस्तांसाठी अक्षयने केली १ कोटी रुपयांची मदत
   दिनांक :07-May-2019
अत्यंत तीव्र अशा फॅनी चक्रीवादळाने ओदिशाच्या किनारी भागाला जोरदार धडक दिल्यानंतर या ठिकाणी मदतकार्य करण्यास सुरुवात झाली आहे. सर्व स्तरांमधून येथील लोकांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. आता बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने मुख्यमंत्री मदतनिधीच्या माध्यमातून एक कोटी रुपयांचा मदतनिधी जमा केल्याचे सांगण्यात येत आहे.
 

 
आजवर कोणतंही राष्ट्रीय संकट आल्यावर किंवा अन्य कोणत्याही राज्यावर अशी परिस्थिती ओढावल्यावर अक्षय कुमारने त्याचा मदतीचा हात पुढे केला आहे. अक्षयने या पीडितांसाठी तब्बल १ कोटी रुपयांची मदत केली आहे. या पूर्वीही अक्षयने ‘भारत के वीर’ या अॅपच्या माध्यमातून मदतनिधी जमाकरुन पीडित व्यक्तींना मदत केली आहे.