अंकीता कनोज अमरावती जिल्ह्यातून प्रथम
   दिनांक :07-May-2019
व्दितीय मानव काळमेघ
अमरावती: सीबीएसईचा इयत्ता दहावीचा निकाल मंगळवार 6 मे रोजी ऑनलाईन जाहीर झाला. जिल्ह्यातून स्कूल ऑफ स्कॉलर्सची अंकीता कनोज ही 98 टक्के गुण घेऊन प्रथम आली आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदाचा निकाल चांगला लागला असून बहुतांश शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे.
 

 
 
जिल्ह्यात सीबीएसईच्या जवळपास 12 शाळा आहे. त्यापैकी 10 शाळा अमरावती शहरात आहे. मंगळवारी निकाल जाहीर होताच विद्यार्थांची निकाल पाहण्यासाठी लगबग सुरू झाली. स्कूल ऑफ स्कॉलर्स शाळेचा निकाल यंदाही 100 टक्के लागला आहे. या शाळेची अंकीता कनोज 98 टक्के घेऊन शाळेतून व जिल्ह्यातून प्रथम आली आहे. याच शाळेचा मानव काळमेघ याला 97.4 टक्के मिळाले आहे. तो जिल्ह्यात दूसरा आहे. रजत धुमाळे याला 96.4 टक्के मिळाले आहे. गुणवंत विद्यार्थांचे शाळेचे प्राचार्य सुरेश लकडे, उपप्राचार्य समिधा नाहर यांनी अभिनंदन केले आहे. शहरातल्या कठोरा मार्गावर असलेल्या एडिफाय शाळेचा निकालही चांगला लागला आहे. येथील तीन विद्यार्थ्यांना 90 टक्केपेक्षा जास्त गुण मिळाले आहे. सात विद्यार्थ्यांना 80 टक्केपेक्षा जास्त गुण मिळाले आहे. महर्षी पब्लिक स्कूल शाळेचा निकाल 100 टक्के लागला असून 17 विद्यार्थ्यांना प्राविण्य श्रेणी मिळाली आहे. त्यापैकी सहा विद्यार्थ्यांना 90 टक्केपेक्षा जास्त गुण मिळाले आहे.
 

 
 
स्कॉलर्स कॉन्व्हेंट या शाळेचा निकाल 94 टक्के लागला आहे. येथील चार विद्यार्थ्यांना 90 टक्केपेक्षा जास्त गुण मिळाले आहे. त्यात अंजली राठी 96.08 टक्के, करिश्मा सोमाणी 94.08 टक्के, सिद्धी लखमानी 94.04 टक्के, संतनू मैत्य 92 टक्के गुण मिळाले आहे. सहा विद्यार्थ्यांना 80 टक्केपेक्षा जास्त गुण मिळाले आहे. तर 70 टक्केपेक्षा जास्त गुण घेणारे विद्यार्थी सहा आहे. विश्वभारती पब्लिक स्कूलचा निकाल 100 टक्के लागला आहे. येथील 18 विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले असून तीन विद्यार्थ्यांना 90 टक्केपेक्षा जास्त गुण मिळाले आहे. सात विद्यार्थ्यांना 80 टक्केपेक्षा जास्त, चार विद्यार्थ्यांना 70 टक्केपेक्षा जास्त तर चार विद्यार्थ्यांना 60 टक्केपेक्षा जास्त गुण मिळाले आहे. अभ्यासा इंग्लिश स्कूलचा निकाल 100 टक्के लागला आहे. येथील एकूण 13 विद्यार्थ्यांना 90 टक्केपेक्षा जास्त गुण मिळाले आहे. या शाळेच्या 39 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. पी आर पोटे पाटील इंटरनॅशनल स्कूलचा निकाल 100 टक्के लागला आहे. या शाळेचे 71 विद्यार्थी परिक्षेला बसले होते. त्यापैकी 16 विद्यार्थ्यांना 90 टक्केपेक्षा जास्त गुण मिळाले. 80 टक्केचेवर गुण घेणारे 27 विद्यार्थी आहे. पोदार इंटरनॅशनल स्कूलचा निकाल 100 टक्के लागला आहे. 49 विद्यार्थ्यांनी 90 टक्केपेक्षा जास्त गुण मिळविले आहे. 53 विद्यार्थ्यांना 80 टक्केपेक्षा जास्त गुण मिळाले आहे. चांदुर बाजार येथील जगदंब पब्लिक स्कूलचा निकाल 100 टक्के लागला आहे. उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे त्या-त्या शाळेच्या प्राचार्यांनी व शिक्षकांनी अभिनंदन केले आहे. विद्यार्थ्यांनीही मिळालेल्या यशाचा आनंद शाळेत साजरा केला.