आर. डी. बर्मन यांच्यावर बनणार चित्रपट !
   दिनांक :07-May-2019
संगीतात नव-नवीन प्रयोग करणारे संगीतकार अशी पंचम दा यांची ओळख होती. पंचमदांच्या स्वरस्पर्शाने ,संगीतसाजाने अजरामर झालेली अनेक गाणी आजही श्रोत्यांच्या कानात रूंजी घालतात. हेच पंचम दा आता चित्रपटरूपात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. 
 
 
 
बंगाली चित्रपटांचे सुपरस्टार प्रोसेनजीत चॅटर्जी यांनी आर. डी. बर्मन यांच्यावर बायोपिक बनण्याचा निर्णय घेतला आहे. आकाश गुप्ता आणि अरून्वा जॉय सेनगुप्ता यांच्यासोबत मिळून त्यांनी या बायोपिकसाठीचे हक्क खरेदी केले आहेत. २०१५ मध्ये आर. डी. बर्मन यांचे ‘आर. डी. बर्मन- प्रिन्स आॅफ म्युझिक’ हे जीवनचरित्र प्रकाशित झाले होते. खगेश देव लिखित या पुस्तकात आर. डी. बर्मन यांच्या खासगी आयुष्याशिवाय त्यांचे बॉलिवूडमधील योगदान याबद्दल सविस्तर लिहिण्यात आले आहे. त्याचे बायोपिक याच पुस्तकावर आधारित असणार आहे.
या बायोपिकमध्ये आर. डी. बर्मन यांची व्यक्तिरेखा कोण साकारणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याशिवाय बंगालीसह अन्य कुठल्या भाषेत हे बायोपिक प्रदर्शित होणार, हेही गुलदस्त्यात आहे. पण पुढील वर्षांपर्यंत पंचम दा यांचे बायोपिक मोठ्या पडद्यावर येईल, अशी शक्यता आहे.
.