दीक्षित डाएटने करणार पोलिसांचा लठ्ठपणा कमी

    दिनांक :07-May-2019
 
 
नाशिक:  पोलीस आणि लठ्ठपणा हे जणू समीकरणच आहे. बऱ्याचदा लट्टपणामुळे त्यांना टीकेचे धनी व्हावे लागते. यावर तोडगा नाशिकमधले पोलीस मधुमेहमुक्त व्हावेत आणि त्यांचा लठ्ठपणा कमी व्हावा यासाठी आता डॉक्टर जगन्नाथ दीक्षित पुढाकार यांनी पुढाकार घेतला आहे. पोलीस दल निरोगी राहिले तर नागरिकांची सुरक्षा ते अधिक चांगल्या पद्धतीने करू शकतील याच भावनेतून दीक्षित यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे.

 
 
 
नाशिक पोलीस आयुक्त कार्यालयात उपचार तसेच मार्गदर्शन करण्यासाठी लवकरच केंद्र स्थापन केले जाणार आहे. पोलिसांनी दीक्षित डाएट प्लान तयार करण्यात आला आहे. सुरूवातीला साडेतीन हजार पोलीस आणि त्यांच्या कुटुंबीयांची स्क्रीनिंग केली जाणार आहे. त्यानंतर योग्य तो सल्ला डॉक्टर दीक्षित देणार आहेत. या वर्षभरात नाशिक पोलिसांचा मधुमेह ५० टक्के कमी करण्याचा आमचा मानस आहे असं दीक्षित यांनी म्हटलं आहे. विशेष म्हणजेच दीक्षित यांना इंडियन मेडिकल असोसिएशन आणि फिजिशियन असोसिएशन यांचीही मदत होणार आहे.