मुंबईच्या ‘द किंग्ज’ने पटकावलं ‘वर्ल्ड ऑफ डान्स’चं विजेतेपद
   दिनांक :07-May-2019
मुंबईच्या रस्त्यांपासून सुरू झालेला ‘द किंग्ज’ या हिपहॉप डान्स ग्रुपचा प्रवास अखेर यशस्वी ठरला आहे. या डान्स ग्रुपचा अमेरिकेत डंका वाजला आहे. ‘द किंग्ज’ने अमेरिकन रिअॅलिटी शो ‘वर्ल्ड ऑफ डान्स’चं विजेतेपद पटकावलं आहे. ‘वर्ल्ड ऑफ डान्स’च्या चषकासह ‘द किंग’ने एक मिलियन डॉलर म्हणजेच सुमारे सात कोटी रुपयांची रक्कमही जिंकली आहे.
 

 
नालासोपाराच्या या १४ जणांच्या ग्रुपने जबरदस्त परफॉर्मन्स करत परीक्षकांचं मन जिंकलं. अमेरिकेत रविवारी झालेल्या वर्ल्ड ऑफ डान्स शोच्या फिनालेमध्ये कॅनेडियन कन्टेम्पररी डान्सर ब्रायर नोलेट, एली आणि एव्हा या बहिणींची जोडी, व्हीपीप्ज, फिलिपाइन्सचा हिप हॉप ग्रुप, युनिटी एलए, दक्षिण कॅलिफोर्नियातील दहा जणांच्या ग्रुपचा सहभाग होता. जेनिफर लोपेज, नया आणि डेरेक ह्यूग हे वर्ल्ड ऑफ डान्सचे परीक्षक होते. त्यांनी ‘द किंग्ज’ला पूर्ण गुण दिले.