मोदींच्या प्रचारसभेसाठी ५ हजार बसेसची बुकींग
   दिनांक :07-May-2019
नवी दिल्ली,
 येत्या ८ मे रोजी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी ऐतिहासिक सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत किती गर्दी होणार आणि मोदी काय बोलणार याची भाजप नेत्यांसह कार्यकर्त्यांना सुद्धा उत्सुकता लागली आहे. मोदींची दिल्लीतील सभा यशस्वी करण्यासाठी येथील कार्यकर्ते पूर्ण ताकत लावत आहेत.
 

 
मोदींची ८ मे रोजीची सभा वर्किंग डे रोजी आहे. मात्र दिल्लीतील नेत्यांच्या मते ही सभा अविस्मरणीय होईल, असं सांगण्यात येत आहे. तसेच सभेसाठी दोन ते अडीच लाख लोक जमतील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. वास्तविक पाहता, रामलीला मैदानाची क्षमता ७० ते ८० हजार लोक बसतील एवढीच आहे. त्यामुळे अडीच लाख लोक कुठं जमणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
भाजपच्या सर्व विभागाच्या नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना गर्दी जमविण्यासाठी सूचना करण्यात आल्या आहेत. दिल्लीतील प्रत्येक भागातून लोक सभेला उपस्थितीत राहतील, यासाठी ५ हजार बसेसची बुकींग करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त लोक वैयक्तीक वाहणे आणि मेट्रोने देखील दाखल होतील. सभेसाठी विशेष तयारी कऱण्यात आली असून रामलीला मैदानाबाहेर रस्त्याच्या कडेला थांबून लोक मोदी-मोदीचे नारे लावणार आहेत. स्टेडियमच्या आत आणि बाहेर प्रत्येकी १०-१० एलईडी स्क्रिन लावण्यात येणार आहेत.