आजचे पंचांग; दिनांक ०७ मे २०१९
   दिनांक :07-May-2019
ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर - ०७ मे २०१९
 
 
!!श्री रेणुका प्रसन्न!!
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार आज दिनांक ०७ मे २०१९ 
भारतीय सौर दिनांक वैशाख १७ शके १९४१
 सूर्योदय -०५:४८
 सूर्यास्त -१८:३२
 प्रात: संध्या - स.०५:१४ ते स.०६:०९
सायं संध्या - १८:५३ ते २०:०१
अपराण्हकाळ - १३:४५ ते १६:१९
प्रदोषकाळ - १८:५३ ते २१:०९
निशीथ काळ - २४:१९ ते २५:०७
राहु काळ - १५:५० ते १७:२५
श्राद्धतिथी - तृतीया - युगादि श्राद्ध
 
सर्व कामांसाठी उत्तम दिवस आहे.
कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:४८ ते दु.०३:३० या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. 
 
 या दिवशी मीठ खावू नये. 
 या दिवशी लाल वस्त्र परिधान करावे.
 लाभदायक वेळा
 लाभ मुहूर्त > १०:५५ ते १२:३१ 
अमृत मुहूर्त > १२:३१ ते १४:०७ 
विजय मुहूर्त > १४:३८ ते १५:२८
 
 पृथ्वीवर अग्निवास दिवसभर
 
रवि मुखात १६:५३ पर्यंत नंतर बुध मुखात आहुती आहे.
शिववास सभेत ,काम्य शिवोपासनेसाठी अशुभ दिवस आहे.
 
 पंचांग  
शालिवाहन शके -१९४१
संवत्सर - विकारी
अयन - उत्तरायण
ऋतु - वसंत (सौर)
मास - वैशाख
पक्ष - शुक्ल
तिथी - तृतीया
वार - मंगळवार
नक्षत्र - रोहिणी (१६:५३ नंतर मृग)
योग - अतिगंड
करण - तैतिल (१५:०१ नंतर गरज)
चंद्र रास - वृषभ
सूर्य रास - मेष
गुरु रास - धनु
 
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण पं देवव्रत बूट
९४२२८०६६१७
 
 विशेष - परशुराम जयंती,अक्षय्य तृतीया ,कल्पादि,युगादि,गंगास्नान,समुद्रस्नान,रवियोग १६:५३ नंतर,लक्ष्मी - नारायण पूजा, विष्णुंना चंदन लावणे व तुळस अर्पण करणे.
 या दिवशी पाण्यात रक्तचंदन चूर्ण व गंगाजल घालून स्नान करावे.
केतु कवच या स्तोत्राचे पठण करावे.
"अं अंगारकाय नमः" या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
गणपतीला गूळ-खोब-याचा नैवेद्य दाखवावा.
सत्पात्री व्यक्तिस मसूर - जलकुंभ - पंखा - साखर - सुवर्ण दान करावे.
 दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना गूळ खाऊन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
चंद्रबळ:- वृषभ,कर्क,सिंह,वृश्चिक,धनु,मीन या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.
*आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो*