पंतप्रधानांना आठव्यांदा क्लीनचीट; मोदींचे 'ते' विधान गैर नाही
   दिनांक :07-May-2019
पंतप्रधान नरेंद्र मोदींना निवडणूक आयोगाकडून पुन्हा एकदा अचारसंहिता भंगाच्या दोन तक्रारींतून मुक्तता करण्यात आली आहे. अहमदाबादमध्ये मतदानादिवशी ‘रोड शो’ करुन मोदींनी आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केलेले नाही, असे निरिक्षण निवडणूक आयोगाने नोंदवले आहे. त्याचबरोबर कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे ९ एप्रिल रोजी मोदींनी आपल्या भाषणात नवमतदारांना आवाहन केले होते की, बालाकोट येथे हवाई हल्ला करणाऱ्या आपल्या शूर जवानांसाठी तुम्ही मतदान करा. हे मोदींचे विधानही गैर नसल्याचे निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे.
 
 
 
त्यामुळे आता एकूण आठ वेळा मोदींना निवडणूक आयोगाकडून क्लीनचीट देण्यात आली आहे.
 
 
२३ एप्रिल रोजी मतदान केल्यानंतर मोदी मतदान केंद्राबाहेर काही वेळ चालत जाऊन माध्यमांशी बोलले होते. मोदींच्या या कृत्यावर काँग्रेसने आक्षेप घेतला होता. अशा प्रकारे मतदानानंतर ‘रोड शो’ करणे आणि माध्यमांसमोर राजकीय भाष्य करणे हा आचारसंहितेचा भंग आहे, अशी तक्रार त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती.