अमेरिकेमध्ये खासगी विमानाला अपघात; १३ ठार
   दिनांक :07-May-2019
वॉशिंग्टन,
अमेरिकेमध्ये खासगी विमानाला अपघात झाला आहे. लास वेगासहून जाणारे हे विमान मेक्सिकोमध्ये कोसऴले असून यामध्ये 13 जण ठार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
 
एका अधिकाऱ्याने सांगितले की, बम्बार्डियर चॅलेंजर 601 जेट विमानाने शनिवारी रात्री उशिराने लास व्हेगासहून मॉन्टेरीकडे उड्डाण केले होते. यावेळी रविवारी उत्तरी मेक्सिकोमध्ये कोएहिला राज्याच्या शेजारी या विमानाशी संपर्क तुटला होता. विमान रडारवरून गायब झाल्याने तातडीने तपास सुरु करण्यात आला होता. आज या विमानाचे अवशेष सापडले.
 
 
या विमानामध्ये दोन पायलट आणि 11 प्रवासी होते. विमानाच्या अवशेषांवरून कोणीही जिवंत राहिले नसल्याची भीती व्यक्त होत आहे.