ड्रेस आणि मेकअपमुळे प्रियंका झाली ट्रोल
   दिनांक :07-May-2019
संपूर्ण फॅशन आणि कलाविश्वाचं लक्ष लागून राहिलेला मेट गाला २०१९ हा सोहळा नुकताच पार पडला. कलाकारांची मांदियाळी आणि कल्पनाशक्तीपलीकडे जाणारी फॅशन अशी एकंदर सांगड या सोहळ्याच्या निमित्ताने घातली गेल्याची पाहायला मिळालं.
  
 
न्युयॉर्कमधील प्रतिष्ठेचा मानला जाणारा ‘मेट गाला २०१९’मध्ये यावेळी ‘नोट्स ऑन फॅशन’ ही थीम ठेवण्यात आली होती. या मेट गालासाठी भारतीय अभिनेत्री प्रियंका चोप्रा तिचा पती निक जोनासबरोबर गेली होती. मात्र यावेळी प्रियंकाने घातलेल्या ड्रेसवरुन ती सोशल नेटवर्किंगवर चांगलीच ट्रोल होताना दिसत आहे. विस्कटलेले वाटावेत अशापद्धतीची हेअरस्टाइल, भडक मेकअप आणि आगळ्यावेगळ्या पद्धतीचा ड्रेस यामुळे अनेकांनी प्रियंकाला सोशल नेटवर्किंगवर ट्रोल केले आहेत.