पुसद: जेट किड्स च्या सी.बी.एस.ई १० वी बोर्डचा सलग चैथ्या वर्षी उत्कृष्ट निकाल.
   दिनांक :07-May-2019
जेट किड्सची उत्कृष्ट निकालाची परंपरा सलग चैथ्या वर्षी कायम
नंदिनी भंडारी 98 टक्के गुण
साहिल खके 97.2 टक्के गुण
इंद्रेष सिंग 97 टक्के गुण
पुसद: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ दिल्ली अर्थात सीबीएसई बोर्डचा वर्ग 10 वीचा निकाल काल ऑनलाइन जाहीर करण्यात आला यावर्षी एकूण 18 लाख विद्यार्थी परीक्षेला बसले होते.
स्थानिक देव बहुद्देशीय संस्था द्वारा संचालित पुसद येथील एकमेव सीबीएसई स्कुल असल्यामुळे सर्वांचे लक्ष जेट किड्स इंटरनॅशनल स्कुलच्या निकालाकडे होत्या तरी अपेक्षेप्रमाणेच सलग चैथ्या वर्षी वर्ग 10 वी च्या विद्याथ्र्यांचा 100 टक्के निकाल लागला आहे. या वर्षी 10 वी बोर्ड परीक्षेला एकूण 62 विद्यार्थी बसले होते त्यातून कु. नंदिनी निलेष भंडारी ह्या विद्यार्थीनीने 98 टक्के प्राप्त करून अव्वल स्थान मिळवले तर अनुक्रमे साहिल राजेष खके ह्यांनी 97.2 टक्के गुण प्राप्त करून दुसरे व इंद्रेष राजेष सिंग यांनी 97 टक्के गुण प्राप्त करून तिसरे स्थान मिळवले
 

 
 
एकूण 62 विद्याथ्र्यांपैकी 6 विद्याथ्र्यांना 95 टक्के च्या वर गुण मिळाले आहेत तर 20 विद्याथ्र्यांना 90 टक्के च्या वर गुण प्राप्त झाले आहे. 25 विद्याथ्र्यांना 75 टक्के च्या वर गुण मिळवले आहे. जेट किड्स चे जवळपास सर्वच विद्यार्थी विशेष प्राविण्य सह उत्तीर्ण झाले आहेत हे विशेष.
सलग उत्कृष्ट निकालाची परंपरा व नावीन्य पूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातच नव्हे तर विदर्भात नावलौकिक असलेल्या जेट किड्स स्कुल च्या उत्कृष्ठ निकालामुळे पालक वर्गात याही वर्षी आनंदाचे व समाधानाचे चित्र पहावयास मिळाले. शाळेच्या व्यवस्थापन समिती ची शिस्तबद्ध कार्यप्रणाली व प्रदीर्घ अनुभव असलेले प्राध्यापक वृंद यांची सांगड घालून शाळेच्या शिक्षकांच्या आणि विद्याथ्र्यांंच्या प्रचंड परिश्रमाने हे यश संपादन केले असे लक्षात येते जेट किड्स सातत्याने विद्याथ्र्यांंना उत्कृष्ट शिक्षण आणि सुसंस्कार देत आहे आणि पुढेही कायम देत राहील असे ह्या डाॅ. निलेष भंडारी ह्या पालकांनी सांगितले तर कडक अनुशासन सोबत विद्याथ्र्यांची परीक्षेची उत्कृष्ठ तयारी शाळेने घेतली ह्याचे समाधान आहे असे डाॅ. रेवणवार/श्रीमती खके ह्या पालकांनी सांगितले
शाळेच्या सर्व यशस्वी विद्याथ्र्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ.अमोल मालपाणी, सचिव, डॉ.अस्मिता मालपाणी, प्राचार्य कौस्तुभ धुमाळे, तुषार सेता अनुराधा देशमुख व सर्व शिक्षक वृंदानी अभिनंदन व कौतुक केले.
साहिल राजेष खके या विद्याथ्र्यांना दोन विशयात 100 पैकी 100 गुण प्राप्त झाले आहे. तसेच इंद्रेष राजेष सिंगला एका विशयात 100 पैकी 100 गुण प्राप्त झाले आहे.