लवकरच येणार ‘गदर -एक प्रेम कथा’चा सीक्वल !
   दिनांक :07-May-2019
उत्तम डायलॉग्स आणि गाण्यांचा भरणा असलेला ‘गदर -एक प्रेम कथा’ हा चित्रपट त्याकाळी प्रचंड लोकप्रिय ठरला होता. या चित्रपटामध्ये अभिनेता सनी देओल आणि अमिषा पटेल मुख्य भूमिकेमध्ये झळकले होते. लवकरच या चित्रपटाचा सीक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या टीममधील एका व्यक्तीने ही माहिती दिली आहे.
 

 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “या चित्रपटाच्या कथेचं सूत्रदेखील गदरप्रमाणेच भारत- पाकिस्तान या विषयाभोवती फिरताना दिसणार आहे. त्यासोबतच या सिक्वेलमध्येही तारा(सनी दिओल), सकीना(अमिषा पटेल) आणि त्यांचा मुलगा जीत या तीन मुख्य पात्रांभोवतीच ही कथा फिरणार आहे. गेल्या १५ वर्षांपासून आम्ही या सीक्वलसाठी काम करत असून सध्या आम्ही सनीशी या चित्रपटासंदर्भात चर्चा करत आहोत”, असं चित्रपटाच्या टीममधील व्यक्तीने सांगितलं.