ट्रम्प यांचे मास्क घालून त्याने केली चोरी, पहा व्हिडिओ
   दिनांक :07-May-2019
कॅनबेरा,
अमेरिकेतल्या एका चोरानं चोरी करण्यासाठी वेगळीच शक्कल लढवली आहे. या चोरानं दुकान लुटण्यासाठी चक्क अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं मास्क घातलं होतं. क्विसलँड पोलिसांनी आरोपीला ओळखून देण्याचं आवाहन केलं आहे.
 
स्ट्रेथपाइनमधल्या दुकानात चोरीची घटना उघडकीस आली आहे. खरं तर ही पूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीनं शॉपिंग सेंटरचा काच फोडून आत प्रवेश केला. त्यानंतर त्यानं ज्वेलरीच्या दुकानाची खिडकी फोडून अनेक घड्याळं चोरली.
 
 
इतकंच नव्हे, तर विजेच्या दुकानाची काचही त्यानं फोडली. काही सामान चोरी करून तो पसार झाला. विशेष म्हणजे आरोपीनं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं मास्क घालून ही चोरी केली आहे. त्यानं ट्रॅक पँट आणि पांढरे बूट घातले होते. या घटनेची सोशल मीडियावर खूप चर्चा आहे. ट्रम्प यांचं मास्क घालून चोरी करणार तो आरोप कोण, याचा आता पोलीस शोध घेत आहेत.