...म्हणून अंपायर निजल लॉन्गनं तोडला दरवाजा

    दिनांक :07-May-2019
 एम चिन्नास्वामी स्टेडिअममधील सामन्यादरम्यान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा कर्णधार विराट कोहलीसोबत नीजल लॉन्ग यांचा वाद झाला होता. या वादानंतर नीजल लॉन्ग इतके संतापले होते की, हैदराबादचा डाव संपल्यानंतर अंपायरने जोरात दरवाजावर लाथ घालून आपला संताप व्यक्त केला. नीजल लॉन्ग यांनी इतक्या जोरात लाथ मारली की दरवाजा तुटला.
 
 
शनिवारी रॉयल चॅलेंजर्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात आयपीएल सत्रातील लीग राऊंडमधील आपला शेवटचा सामना खेळला गेला. यावेळी अंपायर नीजल लॉन्ग यांनी आरसीबीचा गोलंदाज उमेश यादवच्या एका चेंडूला नो बॉल दिला. पण जेव्हा रिप्ले पाहण्यात आला तेव्हा अनुभवी नीजल लॉन्ग यांच्याकडून चूक झाल्याचं स्पष्ट झालं. उमेश यादवचा पाय रेषेच्या मागे पडला असल्याचं स्पष्ट दिसत होतं.
नियमाप्रमाणे हा नो बॉल नव्हता यामुळे गोलंदाज उमेश यादवने आणि विराट कोहली नाराज झाले जे साहजिक होतं. मैदानातील स्क्रीनवर रिप्ले पाहिल्यानंतर उमेश यादव आणि विराट कोहली यांनी नीजल लॉन्ग यांच्या चुकीच्या निर्णयाचा विरोध केला. मात्र अंपायर नीजल लॉन्ग यांनी आपला निर्णय मागे घेतला नाही.