राजीव गांधी समर्थकाने निवडणूक आयोगाला लिहिले रक्ताने पत्र
   दिनांक :08-May-2019
 
 
अमेठी, 
अमेठीमधील एका तरुणाने निवडणूक आयोगाला रक्ताने पत्र लिहिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना लोकांची मने दुखावतील, अशी वक्तव्ये करण्यापासून रोखण्यात यावे, अशी मागणी त्याने या पत्रातून केली आहे. मनोज कश्यप, असे या तरुणाचे नाव असून, तो अमेठीमधील शाहगडचा रहिवासी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधींविरोधात केलेल्या वक्तव्यामुळे आपल्याला खूप मोठा धक्का बसला असल्याचे मनोज कश्यप याने वृत्तसंस्थेस सांगितले.
 
 
 
मनोज कश्यप याने पत्रात लिहिले आहे की, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी मतदानाचे वय 18पर्यंत आणले, त्यांनी पंचायत राज प्रणाली आणली आणि देशात संगणक क‘ांतीही घडविली. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनीदेखील आपल्या एका लेखात राजीव गांधी यांचे कौतुक केले होते.
दिवंगत राजीव गांधी यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य करण्यापासून पंतप्रधानांना रोखले पाहिजे, अशी मागणी मनोज कश्यप याने केली आहे. दरम्यान, कॉंग‘ेसचे आमदार दीपक िंसह यांनी टि्‌वटरवर हे पत्र शेअर केले आहे.