अमेरिकेतील शाळेत विद्यार्थ्यांचा गोळीबार; आठ जखमी
   दिनांक :08-May-2019

 
 
तभा ऑनलाईन,
अमेरिकेच्या कोलोरॅडो शहरातील ‘एसटीईम’ शाळेत अंदाधुंद गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबारामध्ये शाळेतील एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून आठ विद्यार्थी जखमी झाले आहेत. विशेष बाब म्हणजे शाळेतल्या एका विद्यार्थ्यानेच हा गोळीबार केला आहे. गोळीबारात जखमी झालेल्या काही विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 
 
दोन विध्यार्थीं ‘एसटीईम’ शाळेत आल्यानंतर त्यांनी शाळेतील दोन वेगवेळ्या ठिकाणी फायरिंगला सुरुवात केली. पोलिसांनी घटनास्थळावरून एक बंदूक ताब्यात घेतली आहे. दरम्यान, या गोळीबारामध्ये शाळेतील शिक्षक आणि कर्मचारी जखमी झाल्याची कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाही. शाळेतील गोळीबारा प्रकरणी पोलिसांनी दोन विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले असून, विद्यार्थ्यांची चौकशी सुरु आहे.